- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
संयम का आणि कशासाठी
या आर्टिकल ची गरज का पडली :
आज तारीख १७ ऑक्टोबर २०२३ आहे. दिवसाची सुरवात सामान्यपणे होत होती. बाहेर पडलो कि दिसते ते फक्त आपल्या कामाचं ठिकाण. मात्र आज मी आसपास बघण्याचा विचार केला.
गाडी बाहेर काढताच तिला एक मुलगा मोबाइलला बघत बघत धडकला. गाडीवरून पुढे निघालो एक तिशीतील महिला आपल्या मुलाला घेऊन चालली होती. मुलगा जेमतेम ४ वर्षाचा. तो Youtube शॉर्ट ( ६० सेकंद पेक्षा कामाचे व्हिडीओ ) . मी त्या मुलाला बघून थांबलो आणि विचारत केला आज हा मुलगा १० मिनिट चा रास्ता शांतपणे पार करू शकला नाही तर मोठा झाला तर देशाचा पंतप्रधान बानू शकतो का.
जीवनात १२ प्रकार चे virtue ( आत्मसन्मानाने जीवन जगण्याचे मार्ग ) असतात. हे सर्व मार्ग असे आहेत. त्यातील संयम हा एक आहे. मार्ग मी या लेखात समजावले आहेत.
माझे स्पष्ट मत झाले की माझ्या पुढची पिढी जी माझ्यापेक्षा २० वर्ष लहान असेल ती जरूर संयम सारख्या कूल गोष्टी विसरून गेली असेल. संयम हि मनुष्याची सर्वात आकार्षक वैशिष्ठ्य आहे. संयमी मुलगा किंवा मुलगी एका गर्दी मध्ये अधून दिसतात. संयमी व्यक्ती मध्ये आऊट ऑफ बॉक्स विचार करण्याची ताकद असते.
मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. विचार करा एक युद्ध चालू आहे. त्यात २० घोडे आणि ३० सैनिक आहेत. लढण्यासाठी घोडे आवश्यक आहेत मात्र सेनापती किंवा commander १० सैनिक आणि १० घोडे पाठवतो. जेव्हा सैनिक मारले जातात तेव्हा काही घोडे मात्र आपल्या ठिकाणी परत येतात. समजा ५ घोडे परत आले तर नंतर ५ नवीन आणि ५ आधीचे घोडे पाठवता येतात. जर सेनापती (commander) ने सर्व घोडे पहिलेच पाठवले आणि कोणताच घोडा परत नाही आला तर दुश्मन सैनिक राज्यात शिरकाव करेल आणि नाहक सामान्य जनता मारली जाईल .
या उदाहरणातून तुम्ही समजू शकता कि संयम म्हणजे काहीच न करणे होत नाही. असे नाही कि Commander (सेनापती) युद्ध नाही केले पण तो घाबरला नाही, बिचकेला नाही. सैनिकांनी planning केले नव्हते त्यांच्याकडे ३० पेक्षा जास्त घोडे असले पाहिजे होते मात्र त्यांच्याकडे २० घोडे होते. अशा वेळी संयम कामी आला. सेनापती ने त्याचा अनुभव आणि थोडा भावनाशून्य पाने निर्णय घेतला.
उडणारे पक्षी संयम ठेऊनच उडू शकतात. गरुड जर एक दिवस शिकार नाही भेटली तर शिकार करणे सोडत नाही. आई होण्यासाठी जर कळ सोसली नसती तर आपण या जगाला बघू शकलो नसतो. संयम सृष्टी निर्माण करण्यासाठी लागलेला महत्त्वाचं साधन आहे. लाखो वर्ष लागली मातीला उबदार व्हायला. करोडो वर्ष लागली पृथ्वी शांत व्हायला. तब्बल 500 वर्ष लागली mobile सारखे यंत्र बनायला छत्रपती शिवाजी महाराज यांनी शपथ घेतलेल्या दिवसानंतर. किती काय होऊन गेले तेव्हा जाऊन स्वातंत्र्य भेटले.
संयम म्हणजे जी गोष्ट जेव्हा होणार आहे ती तेव्हा नियती नुसार होणार हा विश्वास ठेवणे. विश्वास असणे म्हणजे संयम. म्हणून मला लेखाच्या सुरवातीला येणाऱ्या पिढी बाद्दल चिंता वाटते की तिचे काय होईल एका अर्थाने मी हे म्हणू इच्छितो की येणारी पिढी शक घेणारी असेल. ती कोणावर ठेवलेला विश्वास धासलण्यापासून वाचवू शकणार नाही.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Kindly give your valuable feedback