- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आदरणीय उद्योजक,
GST हा देशभरामध्ये वापरला जाणारा एक व्यापारी ओळखपत्र आहे जे प्रत्येक व्यावसायिकाला घ्यावे लागते जो २० लाखापॆक्षा जास्तीचा Manufacturing Business करतो किंवा ४० लाखापेक्षा जास्त Trading करतो.
प्रत्यक्ष पाहावे लागले जर तुमचे ग्राहक हे कॉर्पोरेट, किंवा इतर व्यावसायिक असतील तर त्यांच्याबरोबर व्यापार करण्यासाठी तुम्हाला GST आवश्यक आहे.
आपण एका उदाहरण बघू...
अनिल नावाचे गृहस्थ अनिल ट्रेडिंग कॉर्पोरेशन नावाचा व्यवसाय करतात. त्यांचा व्यवसाय नवीन आहे. त्यांचे या वर्षाचे अंदाजानुसार व्यवसायाची विक्री १० लाख होईल. अनिल सर यांना GST घेण्याची गरज नाही असे दिसून येते.
मात्र " ब्रँडेड बिल्डर " नावाचे मोठे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांचा १० कोटी रुपयाचा वार्षिक व्यवसाय आहे. " ब्रँडेड बिल्डर " GST कायद्या अंतर्गत ऑडिट मध्ये येतात. त्या कारणामुळे त्यांना GST चे रजिस्ट्रेशन आणि पुस्तके सांभाळणे गरजेचे आहे.
" ब्रँडेड बिल्डर " यांना ५ पाण्याच्या टाक्या पाहिजे आहेत. अशा वेळी विना GST बिल घेतले (खरेदी केली) तर एकतर ऑडिट मध्ये त्यांचे बिल नाकारले जाईल किंवा त्यांना खिशातून (स्वतःच्या पैसे) सरकारला (GST Department ) ला द्यावे लागतील.
५ पाण्याच्या टाक्या प्रत्येकी २५००० रुपयांना आहेत तर एक टाकी ५००० रुपयांना आहे
काय घेतलाय |
किती ला एक घेतले |
किती घेतले |
एकूण सर्व कितीला पडले |
GST किती लावला पाहिजे |
किती पैसे घेतले पाहिजे |
सरकारला किती द्यायचे |
Which Item purchased | At what price One Item Purchased | How Many Item purchase | What is total Cost | How much GST applied in Rupees | How much should we demand at end | How much to be paid to Goverment |
पाण्याची टाकी | ५००० रुपयाला एक टाकी | ५ टाक्या घेतल्या | २५ हजार रुपयाला ५ टाक्या | १८ टक्के एकूण रक्मेकांवर. २५००० वर १८ टक्के = ४५०० | एकूण रक्कम आणि GST ची रक्कम = २५००० आणि ४५०० म्हणजे २९५००. | सरकारला आपण ४५०० द्यायचे. |
या उदाहरणांमधून तुम्हाला समजले असेल कि सरकारला ४५०० रुपये द्यायचे आहेत. मात्र इथे एक गोष्ट आहे ज्याने तुम्ही हे ४५०० रुपये वाचवू शकता. तुम्ही आतापर्यंत खरेदी केलेल्या सर्व गोष्टीवर GST दिलेला असतो. तो GST तुम्ही इथे वापरू शकता.
आतापर्यंत काय खरेदी केले ? | किती रुपयांची खरेदी केली ? | पूर्ण रकमेमध्ये GST किती होता ? | सरकार ने याचा GST घ्याची परवानगी दिली आहे का ? |
---|---|---|---|
टाकी | १,१८,००० | १८,००० | हो दिली आहे |
कॉम्प्युटर | ५०,००० | ५००० | हो दिली आहे |
वाहतूक खर्च | ८०,००० | ० | नाही दिली |
बांधकाम खर्च | १,५०,००० | ३०,००० | नाही दिली |
एकूण | ३९१८०० | ५३००० | -------------------- |
सरकाने किती परवानगी दिली आहे | २३,००० | एकूण २३,००० रुपये ची सरकारने परवानगी दिली आहे |
मित्रानो आता मात्र तुम्हाला ४५०० भरायचे आहेत मात्र तुम्हाला सरकारने २३,००० रुपयांची सूट दिली आहे. या प्रकारास क्रेडिट घेने असे म्हणतात.
तुम्हाला आता २३,००० रुपयांच्या सूट किंवा क्रेडिट मधून ४५०० रुपये भरायचे आहेत. म्हणजे २३,००० वजा ४५०० बरोबर १८,५०० रुपये ची सूट बाकी राहिली.
आता हि १८,५०० रुपये तुम्हाला माघारी भेटत नाहीत. मात्र तुम्ही अजून विक्री करू शकता आणि त्या विक्रीमधून जितका GST भरायला येईल तो भरायचा आहे.
तुम्हाला समजले असेल कि GST मध्ये तुमचा किती मोठा फायदा आहे.
प्रत्यक्षात व्यावसायिकांनी GST काढला आणि प्रत्येक बिल GST मध्ये घेतले तर त्यांना किती फायदा होईल. या व्यवहारात व्यावसायिकाचे ४,५०० रुपये वाचले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Kindly give your valuable feedback